From Founder's Deck

व्यावसायिक स्वपरिचय

मी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका लहानशा गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलो. माझे शिक्षण १२वी विज्ञान पर्यंत गावाच्या स्तरावर पूर्ण झाले. १९८४ मध्ये, अधिक चांगल्या संधींच्या शोधात मी मुंबईत नोकरीसाठी आलो. जीवन संघर्षमय होते—मी १५ वर्षे सर्व साधारण नागरी सुविधा पासून वंचित असलेल्या स्लम/ झोपडपट्टीत  राहिलो, श्रमिक म्हणून काम केले, आणि त्याचबरोबर उच्च शिक्षण पूर्ण केले.

शेवटी, मला सरकारी नोकरी मिळाली आणि मी २५ वर्षे सेवा केली. मात्र, माझी महत्त्वाकांक्षा आणि स्वप्ने केवळ स्थिर नोकरीपुरती मर्यादित नव्हती. कोणताही व्यवसायिक पार्श्वभूमी नसतानाही, मी 22 वर्षे लघु उद्योगांचे प्रयोग केले, ज्यात कपडे, गॅजेट्स, विमा, एमएलएम आणि रिअल इस्टेट व्यवसाय यांचा समावेश होता.

समाज आणि देशासाठी काहीतरी करण्याची माझी प्रबळ इच्छा आहे. म्हणूनच, मी नवीन संधी, नवीन संकल्पना आणि लोकांना सक्षम करण्याचासातत्याने प्रयत्न करतो,जेणेकरून ते आर्थिकस्वातंत्र्य आणि यशाकडे वाटचाल करू शकतील.     

आणि ह्यच मुळे की काय? किंवा माझ्या मदतीच्या वृत्तीमुळे आणि सर्जनशील बुद्धीमुळे, आज पर्यंत शंभरहून अधिक लोकांना उद्योजक आणि करोडपती बनविण्यास मदत करु शकलो. 

माझा संकल्प आहे की 10 वर्षात  किमान  5 लाख मराठी प्रांतीयांना डिजिटल ब्रम्हांड च्या माध्यमातून होतकरु तरुण/तरुणी  आणि महिला/पुरुष यांना प्रशिक्षित करून मल्टी सोर्स आणि पॅशिव इनकम निर्माण करने हां माझा फक्त निर्धारच नाही तर‌ एक मिशन आहे, उदिष्ट आहे.

Vilas U Shinde Founder

About Digital Bramhand

आजचा काळ डिजिटल क्रांतीचा !

आजचा काळ डिजिटल क्रांतीचा आहे. लहान व्यवसायांपासून मोठ्या ब्रँडपर्यंत सर्वच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली उपस्थिती निर्माण करत आहेत. अशा परिस्थितीत डिजिटल मार्केटिंग शिकणे ही केवळ एक निवड राहिली नसून, ती प्रत्येकासाठी गरज बनली आहे.

डिजिटल शिक्षणाची नवी दिशा :

डिजिटल ब्रह्मांडचे संस्थापक विलास शिंदे जी यांनी त्यांच्या सखोल शिकण्याच्या वृत्ती (Learning Attitude) आणि काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवण्याच्या क्षमतेमुळे डिजिटल मार्केटिंगच्या महत्त्वा (importance)ची जाणीव झाली. त्यांचा दीर्घकालीन उद्योजकीय अनुभव आणि डिजिटल क्षेत्रातील सखोल समज यामुळे त्यांनी सामान्य लोकांसाठी एक Digital  agency  स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प :

विलास शिंदेजी यांना असे वाटते की डिजिटल मार्केटिंग हे केवळ मोठ्या कंपन्यांसाठी किंवा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मर्यादित राहू नये, तर प्रत्येक व्यावसायिक, नवउद्योजक, विद्यार्थी आणि इच्छुक व्यक्तींनीही ते आत्मसात करायला हवे. याच उद्देशाने त्यांनी डिजिटल ब्रह्मांड या डिजिटल मार्केटिंग agency ची   स्थापना केली.

विलास शिंदेजींच्या मते,शिकण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही आणि नवोपक्रम करण्यासाठी  कधीही उशीर होत नाही. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे, यासाठीच त्यांनी डिजिटल ब्रह्मांड  ची स्थापन केली. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक नवउद्योजक, व्यावसायिक आणि विद्यार्थी डिजिटल कौशल्ये आत्मसात करून यशस्वी होत आहे.

सामान्य माणसाला डिजिटल तंत्रज्ञानाची ताकद देण्याचा संकल्प :

विलास शिंदे जींच्या मते, डिजिटल मार्केटिंग हे भविष्यातील यशस्वी व्यवसाय आणि करिअर घडवण्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे शिकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे ज्ञान सहज उपलब्ध व्हावे,  आणि या द्वारे प्रत्येक व्यक्तिला एकाच कामातून विविध उत्पन्नाचे श्रोत कसे निर्माण होतील‌ याची सांगड घातली आहे जेने करुन भविष्यात कधीही आर्थिक संकट ओढवणार नाही.

डिजिटल मार्केटिंग शिकण्याची महत्त्वाची कारणे

१. व्यवसाय वाढवण्यासाठी अनिवार्य

पूर्वी व्यवसाय वाढवण्यासाठी जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत असे. पण आता डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने कमी खर्चातही मोठ्या प्रमाणावर ग्राहकांपर्यंत पोहोचता येते.

  • सोशल मीडिया जाहिराती
  • सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)
  • ईमेल मार्केटिंग
  • वेब ट्रॅफिक वाढवणे

ही तंत्रे वापरून व्यवसायाचे विक्रीत रूपांतर (conversion rate) वाढवता येते.

२. चांगल्या करिअर संधी उपलब्ध

आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग हे एक वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. विविध उद्योगांमध्ये डिजिटल मार्केटिंगच्या तज्ज्ञांना मोठी मागणी आहे.

  • SEO एक्सपर्ट
  • सोशल मीडिया मॅनेजर
  • कंटेंट मार्केटर
  • डिजिटल जाहिरात तज्ज्ञ (PPC Expert)
  • ईमेल मार्केटिंग स्पेशलिस्ट

हे सर्व डिजिटल कौशल्ये आत्मसात केल्यास चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सहज मिळू शकतात.

३. कमी खर्चात मोठा परिणाम

पारंपरिक जाहिराती (TV, रेडिओ, बॅनर) या खूप महागड्या असतात. त्याउलट, डिजिटल मार्केटिंग कमी खर्चातही प्रभावी मार्केटिंग करू शकते.

  • सोशल मीडिया जाहिराती (Facebook, Instagram, YouTube)
  • ब्लॉग आणि कंटेंट मार्केटिंग
  • SEO आणि ऑर्गनिक ट्रॅफिक

या गोष्टींनी लहान व्यवसायांना मोठ्या स्पर्धकांशी टक्कर देता येते.

४. फ्रीलान्सिंग आणि घरबसल्या कमाईची संधी

डिजिटल मार्केटिंग शिकल्यास आपण कोणत्याही कंपनीत नोकरी न करता, घरबसल्या देखील कमाई करू शकतो.

  • फ्रीलान्सिंग करून विविध कंपन्यांसाठी डिजिटल मार्केटिंग सेवा देणे
  • ब्लॉगिंग, एफिलिएट मार्केटिंग, आणि यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावणे
  • स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करणे

५. ग्लोबल मार्केटमध्ये पोहोचण्याची संधी

डिजिटल मार्केटिंगमुळे कोणताही व्यवसाय स्थानिक मर्यादांपलीकडे जाऊन जागतिक स्तरावर पोहोचू शकतो.

  • ऑनलाइन स्टोअर आणि ई-कॉमर्स
  • जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल जाहिराती
  • विविध देशांमध्ये ब्रँड ओळख निर्माण करणे

६. डिजिटल मार्केटिंग हे भविष्यातील ट्रेंड आहे

आजची युवा पिढी मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियावर अधिक वेळ घालवत आहे. त्यामुळे कंपन्याही त्यांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगवर अधिक भर देत आहेत.
AI (Artificial Intelligence), Chatbots, आणि ऑटोमेशन यांसारखी नवीन तंत्रे डिजिटल मार्केटिंगमध्ये झपाट्याने विकसित होत आहेत. त्यामुळे यामध्ये तज्ज्ञता मिळवणे भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या स्पर्धात्मक युगात डिजिटल मार्केटिंग शिकणे ही काळाची गरज बनली आहे.
✅ व्यवसाय वाढवण्यासाठी
✅ करिअरच्या उत्तम संधींसाठी
✅ कमी खर्चात प्रभावी जाहिरातींसाठी
✅ घरबसल्या आणि फ्रीलान्सिंगसाठी
✅ ग्लोबल ब्रँड निर्माण करण्यासाठी

 

For joining

Scroll to Top